Posts

Showing posts from January, 2020

मनीं नाही भाव म्हणे देवा मला पाव -poems Nandanshivni

मनीं नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला वडराचं भेव लाकडाचा देव त्याला अग्‍निचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव सोन्याचांदीचा देव त्याला चोरांचं भेव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व नाही दगडात देवाचं देवत्व नाही लाकडात सोन्याचांदीत नाही देवाची मात देव बाजारचा भाजीपाला नाही रे भाव तिथं देव ही संतांची वाणी आचारावाचून पाहिला का कोणी शब्दाच्या बोलांनं शांती नाही मनी देव बाजारचा भाजीपाला नाही रे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई मी-तू मेल्याविण अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही देव बाजारचा भाजीपाला नाही रे

सर्व शेतकरी योजना एकाच ठिकाणी