👀शत्रूच्या मनात धडकी भरवणारे भारताचे पाच special forces!
भारताच्या स्पेशल फोर्सेस या थेट भारतीय लष्कराच्या नियंत्रणाखाली असतात आणि स्पेशल ऑपरेशन्ससाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. भारताच्या याच स्पेशल फोर्सेसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मार्कोस मरीन कमांडोजचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे मार्कोस! हे भारतीय नौदलाचे स्पेशल युनिट म्हणून ओळखले जाते. ही फोर्स कोणत्याही दुर्गम भागामध्ये ऑपरेशन पूर्णत्वास नेऊ शकते परंतु मरीन एनव्हाररमेंटमध्ये त्यांचे स्पेशलायझेशन आहे. १९४७ पासून मार्कोस देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. दहशतवाद्यांशी लढणे, नौदला सोबत युद्धात सहभाग आणि संकटात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यामध्ये मार्कोसने नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. शत्रू देश आणि दहशतवाद्यांमध्ये मार्कोसची मोठी भीती आहे. वेळोवेळी मार्कोस इतर देशांसोबत स्पेशल ट्रेनिंगमध्ये देखील सहभागी होते. * पारा कमांडोज * भारताच्या सर्वोत्तम स्पेशल फोर्सपैकी एक फोर्स म्हणजे पारा कमांडोज ! भारतीय लष्कराचे युनिट म्हणून १९६५ मध्ये या फोर्सची स्थापना करण्यात आली. होस्टेज रेस्क्यू, काउंटर टेररिज्म, पर्सनल रिकवरी यांसारख्या परिस्थिती हाताळण्य