Posts

Showing posts with the label श्रमाची पूजा - बोधकथा

श्रमाची पूजा - बोधकथा

*🙏रविंद्रनाथांची ही लिखित  कथा आहे.📝*🙏 *😊माणूस भूमातेला 🌎 म्हणाला , " हे धरिञी! तू मोठी कृपण आहेस. कठिण श्रम आणि नखशिखांत घाम गाळल्याशिवाय जर तू आम्हांला अन्न देत जाशील तर त्याने तुझे काय कमी होईल ? " धरिञी 🌎हसून 😀 म्हणाली , " माझा  तर यात गौरवच वाढेल परंतु तुझा गौरव माञ लुप्त होऊन जाईल ."* *तात्पर्यः  परिश्रमामुळे जीवन  स्वावलंबी आणि पुरुषार्थी बनते , जीवन धन्य होऊन जाते.*

श्रमाची पूजा - बोधकथा

एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियातील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावायास गेला होता.* *मजूरांना वाटण्यासाठी फाउंटनपेन , चाँकलेट वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजूरांच्या चाळीत जाऊन त्यांना तो ते बक्षिस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे आला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही.*     *तो म्हणाला , "घ्या , मी प्रेमाने देत आहे ".  ते मजूर म्हणाले , " स्वतःच्या श्रमाने मिळवावे, दुसऱ्याचे दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आळस, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयचा.या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे ."* *तात्पर्यः स्वावलंबन ,तेज श्रमाची पूजा ह्याचे महत्त्व सर्वांनी जाणले पाहिजे.*