Posts

Showing posts with the label भित्रा व शूर मित्र - बोधकथा

भित्रा व शूर मित्र - बोधकथा

एक चोर दोन मिञांवर हल्ला करतो. त्यातला एक मित्र जीव वाचविण्यासाठी पळून जाऊन लपून बसतो. पण दुसरा शूर मित्र चोराचा मुकाबला करतो आणि त्याला जखमी व निशस्ञ करतो. हे पाहून डरपोक, भिञा मित्र परत येतो. तिथे जवळ एक लाकूड पडलेले असते ते लाकूड घेतो आणि चोराला म्हणाला 'थांब आता मी तुला माझी बहादूरी दाखवतो. त्याला माहित होते कीं, चोर आता त्याचे काही नुकसान करू शकत नव्हता.त्यामुळे भिञ्या मिञांने परिस्थितीचा फायदा घेतला. तो चोरासमोर बढाया मारू लागला.शूर मित्र त्याला म्हणाला, तूं आता शौर्याचे नाटक नको करूस.स्वतःच्या हातातील लाकूड फेकून दे . तू अशा वागण्याने दुस-यांना मुर्ख बनवू शकतो. मला तुझे खरे रूप कळले आहे. खर म्हणजे तू येथेच थांबून माझी मदत करायला हवी होती. धीराचे शब्द उच्चारून माझा आत्मविश्वास वाढवायला हवा होता .मी पाहिले आहे तूं किती भिञा आहे.  तूं तुझा जीव वाचवून पळून गेलास.  कुठल्याही संकटाच्या क्षणी तुझ्या सारख्या माणसांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे ऐकून भिञा मित्र खाली मान घालून तेथून निघून गेला. *तात्पर्य* :- *विश्वासाला* *कधी तडा जाऊ देऊ नये*.