कुबडे मन - बोधकथा
एक म्हातारी होती. कमरेत खूप वाकली होती. तिच्या पाठीला कुबड होते.मुले तिच्याकडे पाहून हसत. तिची टिंगल करीत. मोठ्या माणसांना तिच्याबद्दल सहानुभूती वाटे . म्हातारीचा चेहरा सदैव त्रासलेला असायचा. एकदा नारद ऋषींनी त्या म्हातारीची कष्टमय अवस्था पाहिली. त्यांना वाईट वाटले.दया उत्पन्न झाली.ते म्हणाले, "बाई,तुझी इच्छा असेल तर तुझ्या पाठीचे कुबड मी नाहिसे करतो.त्यामुळे चालतांना तुला अजिबात त्रास होणार नाही. मजजवळ मंत्रसामर्थ्य आहे.त्याने तुझे दुःख दूर होईल." म्हातारी त्यावर म्हणाली, "मला कुबडाचे दु:ख अजिबात नाही. ही आजूबाजूची माणसं सरळ चालताना पाहून मला वाईट वाटते.राग येतो, दु:ख होते. तुझ्याजवळ खरीच काही मंत्रशक्ती असेल तर या सर्वांना कुबडे कर."नारद ऋषींच्या लक्षात आले की,त्या बाईचे केवळ शरीरच नव्हे तर मन पण कुबडे आहे. असूयेच्या आगीने ती पेटलेली असल्यामुळे तिला शांती व समाधान कधीच लाभणार नाही. *तात्पर्यः समाजात आपल्याला काही माणसे स्वतःचे भले व इतरांचे भले व्हावे, काही माणसे स्वतःचे वाटोळे व इतरांचे वाटोळे व्हावे, तर काही माणसे आपले भले व इतरांचे वाट...