प्रवास जीवनाचा - बोधकथा
एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते. शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल? बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!' एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!" तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!" शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?" तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!" "तुझे उत्तर बरोबर आहे!" शिक्षक हलकेच म्हणाले. बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल. खूप वर्षानंतर, वार्धक्यान...