Posts

Showing posts with the label जाणून घ्या शरीरातील जिवाणूंचे फायदे - आरोग्य

जाणून घ्या शरीरातील जिवाणूंचे फायदे - आरोग्य

प्रथम बॅक्टेरियाला मराठीत जिवाणू म्हणतात. शरीरात जिवाणूंचे दोन प्रकार पडतात, एक गट चांगल्या जिवाणूंचा असतो तर दुसरा वाईट जिवाणूंचा. जे चांगले असतात ते बऱ्याच पचनसंस्थेसंबंधी क्रियांमध्ये मदत करतात. जसे की खाल्लेल्या अन्नातून विविध जीवनसत्वे मिळवायचे प्रमुख काम चांगले जिवाणू करतात. त्वचेवर देखील बऱ्याच प्रकारचे जिवाणू असतात हे त्वचेचे बाहेरील बुरशी किंवा इतर वाईट जिवाणूंपासून संरक्षण करतात. म्हणून आपल्या शरीरात हे जिवाणू असणे खूप गरजेचे असते. एका प्रयोगानुसार एका डुकरांवर प्रयोग करण्यात आला. काही डुकरांना जिवाणू समवेत ठेवण्यात आले आणि काहींना जिवाणू रहित ठेवण्यात आलं. जिवाणू रहित डुकरे होते ते खूप अशक्त बनले व त्यांचा मृत्यू लवकर झाला. म्हणून माणसाच्या शरीरामध्ये जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु फक्त चांगले बॅक्टेरिया असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण वाईट बॅक्टेरिया हे शरीराला घातक ठरू शकतात.