Posts

Showing posts with the label जिवन विचार - 47

जिवन विचार - 47

महान दार्शनिक कनफ्यूशियसने आपल्या वाणीचा सदुपयोग माणसाने कसा करावा हे सांगितले आहे. माणूस समाधान मिळावे म्हणून जगत असतो . जीवनाचे समाधान समतोल वाणीच्या सयंमावर आणि सदुपयोगावर अवलंबून आहे.        त्यामुळे त्याचे स्वतःचे हित तर होतेच , पण समाजाचेही हित झाल्याशिवाय राहत नाही.        विनोबा म्हणतात , " वाणीने सख्य साधता येते , वाणीने वैरही बांधता येते.  वाणीचे वैर टिकते , तितके शस्त्रांचे टिकत नाही ".  म्हणून  विश्वाशी मैत्री इच्छिणाऱ्या विश्वामित्राची प्रार्थना आहे 🙏-- ' अमृत मे आस' ( माझ्या वाणीत अमृत असावे.) समर्थ रामदासही सांगतात -- ' जगामध्ये  जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र!