Posts

Showing posts with the label लग्न - बोधकथा

लग्न - बोधकथा

*उंदरामुळे जाळ्यातून*सुटलेला सिंह खुष होऊन त्या उंदराला म्हणाला,' अरे,तू माझ्यावर फार उपकार केले आहेस त्यासाठी तुला जे काय  हवे असेल ते माझ्याजवळ माग, मी देतो.  'ते ऐकून उंदीर गर्वाने फुगला व आपल्या योग्यतेचा विचार न करता म्हणाला, 'महाराज, ज्या अर्थी आपण आनंदाने काय पाहीजे ते माग म्हणता त्या अर्थी काहीही भिती न धरता मी मागतो की तुमची मुलगी मला द्यावी. ' हे ऐकताच सिंहाला फार वाईट वाटले, पण तो वचनात गुंतल्यामुळे त्यासाठी तुला नाही म्हणता आले नाही. त्याने आपली मुलगी आणून उंदराच्या स्वाधीन केली.ती तरूण मुलगी मोठ्या डौलाने चालत असता तिचा पाय उंदरावर पडून तो तात्काळ मरण पावला. 〰〰〰〰〰〰〰〰〰〰 🎀 *तात्पर्य*: *जे मागायचे ते विचारपूर्वक व आपल्या योग्यतेला साजेल असे मागावे नाहीतर भलतेच मागणे मागीतल्यामुळे संकट निर्माण होईल.*