Posts

Showing posts with the label कष्टाचे मोल अनमोल - बोधकथा

कष्टाचे मोल अनमोल - बोधकथा

*ग्रीसमध्ये हेलाक नावाचा एक धनवान आणि लोभी माणूस राहत होता. आपल्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक मा णसाला ठकवणे त्याचे नित्या चे काम झाले होते. त्यातून तो भरपूर धन जमा करायचा. मात्र ते धन त्याच्याकडे टिकत नसे. कधी आजारात खर्च होत असे तर दुकानदारीत कधी खोट येत असे. हे पाहून त्याची सून त्याला समजवायची कि बेइमानीचे पैसे कधीच टिकत नसतात. परंतु हेलाक तिचे कधीच ऐकत नसे.* *एके दिवशी त्याच्या मनात विचार आला कि सून जे म्हणते आहे त्याची परिक्षा घेवून बघू. त्याने इमानदारीने धन जमा करून त्याचे एक सोन्याचे गंठण बनवले व ते एका कपड्यात बांधले व त्यावर स्वत:चे नाव टाकून चौकात ठेवून आला. बरेच लोक येत जाता त्या कपड्याकडे बघत पण कोणीही उचलून नेले नाही. सर्वांच्या पायात लागत होते म्हणून एका माणसाने ते तसेच उचलले आणि तळ्यात फेकून दिले. तळ्यातील एका मगरीने ते गिळले. काही दिवसांनी एका मच्छिमाराला जाळ्यात ती मगर सापडली. त्यांनी तिचे पोट फाडले तेंव्हा तिच्या पोटात कापडात बांधलेले सोन्याचे गंठण निघाले, मच्छीमारांनी हेलाकचे नाव त्यावर पाहिले व बक्षिसाच्या आशेने गंठण त्याला आणून दिले. अनेक महिन्यांनी आपले सोन्याच