ट्रक ड्रायव्हर आणि मुर्ख - बोधकथा
🚍 एक ट्रक ड्रायव्हर आपल्या सामानाची डिलेव्हरी करायला एका वेड्याच्या इस्पितळात जातो. काम करून परत निघणार, तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की,🚍 ट्रकचं एक चाक पंक्चर झालंय. तो ते चाक काढतो. आणि स्टेपनी लावणार इतक्यात, त्याच्या हातून त्या चाकाचे चारही नट गटारीत पडतात, अन् ते काढणं पण शक्य नसतं. 🚍 ड्रायव्हर हताश होऊन बसतो. त्याला काय करावं ते सुचत नाही. एवढ्यात, एक मनोरुग्ण तिथे येतो आणि विचारतो काय झालं ? पहिले तर 🚍 ड्रायव्हर काहीच बोलत नाही. तो मनोरुग्ण परत पुन्हा विचारतो, काय झालं ? शेवटी 🚍 ड्रायव्हर त्याला संपूर्ण कहाणी सांगतो आणि शांत बसतो. हे पाहून तो मनोरुग्ण त्याला काय मूर्ख माणूस आहे ? असं म्हणून त्याच्या वर हासतो. आता 🚍 ड्रायव्हरला राग येतो. तो त्या मनोरुग्णाला उपाय सांगण्याचं आव्हान देतो . मनोरुग्ण उत्तर देतो - त्यात काय एवढं ? इतर ३ चाकांचे एक एक नट काढून त्या चाकाला लाव, आणि ट्रक घेऊन जवळच्या गॅरेजवर जा .🚍 ड्रायवर चाट पडतो आणि म्हणतो - तुम्ही तर चांगले शहाणे दिसता, मग इथे काय करतायत ? तो उत्तरतो - मी वेडा असेन रे पण मूर्ख बिल्कुल नाही ... मित्रांनो त्या🚍 ड्राय...