◼️ कविता :- खेळ मांडला | मराठीचे शिलेदार कविता समूह
✍️ खेळ मांडला ⚱️ लहानपणी खेळायचो खेळ नित्य भातुकलीचा भांडीकुंडी ती खेळताना खूप आनंद मिळायचा !! बालपण ते बालपण असते खेळकर क्षण लोभ नसतो कसला निखळ आनंदी क्षण !! मोठे झालेवर पाहे खरा खरा संसार आहे स्वप्न मनी बाळगताना साकारण्याचा क्षण पाहे!! खेळ मांडला आहे देवा सत्याला न्याय मिळावा जे खरंच कष्ट घेतात तयांचा विजय व्हावा !! न्यायाच्या मार्गातील सारे अडथळे दूरची करा प्रामाणिकाची कीव करा न्यायाचे छत्र हाती धरा !! ✍️ सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे) म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह . 🔷🔸🔷🔸🔷🔸🔷🔸🔷🔸🔷