Posts

Showing posts with the label अंधश्रद्धा गीत - poem

अंधश्रद्धा गीत - Poem

माणूस झाला दगड दगड झाला देव... मस्तक ठेवून बोलतो मला सुखी ठेव..... १ दगडापाशी दूध ,दही खोबरेची होते भेळ... मंदिराच्या पायथ्याशी भूकी जीवांचा मेळ... २ दगडच्या देवाला नेसतात वस्र सारें... देवाच्या पायथ्याशी उघडी नागडी पोरे...३ ह्या विज्ञानयुगी अंधश्रद्धेचा वाढला जोर... दगडाच्या मंदिरापाशी पुजारी बनला चोर...४