Posts

Showing posts with the label whatsapp group

◼️ कविता :- ग्रुपचे नाते

Image
ग्रूपचेे नातं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जपायचं नातं म्हणून,  निर्माण केला ग्रुप.. सगळेच आपले म्हणून, भावना जपा खूप..   कोणी दिला रिप्लाय, म्हणून हुरळून जायचं नाही.. आणि नाही दिला रिप्लाय,  म्हणून खंत मानायची नाही.. सर्वांची मतं कायम, एकसारखी असतील कशी.. नकारार्थी, सकारार्थी, प्रत्येकाची वेगळी अशी.. राखायची असेल अबाधित,  एकमेकांची साथ.. तर द्यावाच लागतो सर्वांना, प्रेमाचा हात.. प्रत्येकाचं मत,  वेगळं असायलाच हवं.. तरच घडेल इथे,  रोज काहीतरी नवं.. काय बरं होईल,  नावडत्या जोकवर हसलं तर.. मनातल्या भावना झाकून, थोडसं फसलं तर.. फक्त एकच करा मित्रांनो, वेळ काढा थोडा.. प्रत्येक जण असावा, दुसऱ्यासाठी वेडा.. कधी गडबड, कधी बडबड, कधी बरीच शांतता.. दाखवून द्या ना एकदा, अंतरंगातील एकात्मता..  दुरावलेल्या दोन मनांत, एक पूल बांधणारा.. एखादा असतोच ना, निखळणारे दुवे सांधणारा.. ग्रुप असो नात्यांचा, वा असो तो मित्रांचा.. आपल्या हजेरीने बनवा, स्वप्नांमधल्या चित्रांचा..                  ...