Posts

Showing posts with the label धक्का लागल्याने कळून येत व्यक्तीमत्व - बोधकथा

धक्का लागल्याने कळून येत व्यक्तीमत्व - बोधकथा

एकदा एका गुरुंनी आपल्या शिष्यांना ज्ञान देण्याच्या उद्देश्याने एक प्रश्न विचारला. त्यांनी म्हटले की समजा आपल्या हातात दुधाचा ग्लास आहे आणि तेवढ्यात अचानक आपल्याला कोणी धक्का दिला तर काय होईल? शिष्य म्हणाला की ग्लासातून दूध बाहेर पडेल.   गुरुजींनी विचारले दूध का बाहेर पडेल? तर एका शिष्याने उत्तर दिले धक्का बसल्यामुळे दूध बाहेर पडेल.   हे ऐकून गुरुजींनी शिष्याचं उत्तर चुकीचे आहे असे म्हणत सांगितले की ग्लासात दूध होतं म्हणून दूध बाहेर पडलं हे योग्य उत्तर आहे कारण आपल्याकडे जे असेल तेच बाहेर पडेल. गुरुजींनी म्हटले की याच प्रकारे जीवनात जेव्हा धक्के बसतात तेव्हा आमच्या व्यवहारातून वास्तविकता बाहेर पडते. आमच्याकडे असलेलं बाहेर पडतं जसे धैर्य, मौन, कृतज्ञता, स्वाभिमान, निश्चिंतता किंवा या उलट क्रोध, घृणा, द्वेष, कडूपणा, ईर्ष्या इ. आपलं सत्य तो पर्यंत बाहेर दिसून येत नाही जो पर्यंत धक्का बसत नाही.