समज नात्यांची - मराठीचे शिलेदार समूहावर ०५/१०/२०२० ला प्रकाशित झालेल्या काही सर्वोत्कृष्ट कविता
अशी कशी हरवली.. जगी समज नात्यांची कुस्करली जाते अब्रू इथे कोवळ्या पात्यांची एक काळ तो होता... रक्ताच्या नात्यांपरिस शेजारधर्म श्रेष्ठ होता आज घरातलेच किडे वळवळतात वासनेने सांगा नात्यांना जगात काय अर्थ उरला आता काका...मामा...आजोबा बापापेक्षाही नाती ही... कधीकाळी श्रेष्ठ होती बाप नसतानाही कधी माणुसकी जागवत होती आज हीन ठरतेयं नाती विश्वास कुणावर ठेवावा..? समज नात्यांची जाणावी असा आदर्श कुठे पाहावा..? सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर , चंद्रपूर सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक ©मराठीचे शिलेदार समूह ✍️समज नात्यांची✍️ समज नात्यांची कशी राहिली समज अन् गैरसमज यांच्या पलिकडे गेली सुख दुःखाच्या सिमा रेषा पूर्ण ओलांडून ती ह्दद् पार झाली अशी ही नाती गोती पूर्वी तूटता तूटत नव्हती आज जुळता जुळत नाही मी अन् माझ या नित्ती मत्तेच्या भोवऱ्यात समाज वावरतो मज कुणाची न लगे गरज मी म्हणें सर्व श्रेष्ठ...... माझ् शिवाय कोणा न कार्य सफल ही फक्त विचार सरणी पण कृती मात्र शून्य........ संस्कांराच्या नावाखाली पिढी पूर्ण दबली जात आहे मी त्वाचे अस्तित्व रसा तळाला जात...