बेलफळाचे आरोग्यीक फायदे - आरोग्य
वैदिक आर्यांनी देखील बेलवृक्षातील औषधी गुण हेरले होते. बेलफळाचे वर्णन आपल्याला जागोजागी मिळते. बिल्वालाही उपकारी मानले जाते. ' महान्वै भद्रो बिल्वो महान् भद्र उदुंबर अथर्ववेद'. महान पुरूष बेलफळासमान उपकारी असतो. बिल्वाला महान आणि भद्र अर्थात सज्जन-दुसर्यांची मदत करणारा, कोणाच्याही प्रती वाईट भावना न ठेवणारा मानले जाते. कमी पाणी असणार्या क्षेत्रातही कोणाच्याही संरक्षण आणि परिश्रमाशिवाय स्वत: उगणारा हा वृक्ष खर्या अर्थाने सेवक आहे. मनुष्य आणि पशू-पक्षी दोघांना भोजन प्रदान करतो. भोजनही असे की जे मधुर आहे, कल्याणकारी आहे, औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. या वृक्षाच्या स्तुतीत जे लिहिले गेले किंवा लिहिले जाईल ते कमीच ठरेल अशी या वृक्षाची किमया आहे. या वृक्षाचे फळ गोल असते. या फळाची बाहेरची त्वचा लाकडासमान मजबूत असते. डिसेंबर-जानेवारीत पाने गळल्यानंतर फ्रेब्रुवारीत नवीन पानांसोबत लहान लहान श्वेत पुष्प फुलतात. हीच फुले नंतर लहान-लहान टणक गोल फळांमध्ये परिवर्तित होतात. मे महिन्यात फळे पिकण्यास सुरुवात होते आणि ही प्रक्रिया काही महिन्यांपर्यंत चालते. बर्याचदा तोडली न गेलेली फळे तीन पाव ...