Posts

Showing posts with the label आयुष्य - कविता

◾कविता :- संकटच स्वानुभवे... | कवी रा. र. वाघ

Image
सं कटच सकलांना क रतात अनुभवी ट वटवी प्रयत्नांना  च तुराई स्वानुभवी स्वा नुभव साधतांना नु रेनाच शान काही भ र पडे शिकतांना वे गळेच ज्ञान काही स बबीने धडपडे ब ळे युक्ती आजमावी ल क्ष्य साध्य असे घडे ता कदीचा जोर लावी आ ज यश मिळे जरी का लचाच ध्यास होता र त होता खास तरी ती व्र असा यत्न होता गु रु बने संकटच रु ळलेल्या वाटेतच रु क्षपण वाटताच पी ळ पडे दंडातच ते च मानी आवाहने मा र्ग शोधी सुटकेचा ना दी लागे प्रयासने वे ध घेई संकटाचा दृ ढ होते मन असे ढ ळेचना धैर्य कदा ज्ञा त होता मनी वसे न कळत स्थैर्य सदा सा तत्याने परीक्षेचे का र्य संकटाचे चाली  र सरुप विरतेचे ती च ठरे खुण भाली निर्मिती:- रा.र.वाघ,धुळे.  मो.नं.७५०७४७०२६१) _____________________________  सदर कविता आवडल्यास नक्की शेअर करा

◼️ कविता :- आयुष्य ...

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडं आहे, सोडवाल तितक थोडं आहे, म्हणुन म्हणतेय आयुष्यात येऊन माणसं मिळवावी…!! एक-मेकांची सुख दु:खे एक-मेकांना कळवावी  बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोप असतं… जगायला गेलं तर दु:खातही सुख असतं… चालायला गेलं तर निखारेही फूले होतात… तोंड देता आले तर संकट ही शुल्लक असतं… वाटायला गेलं तर अश्रूंत ही समाधान असतं… पचवायला गेलं तर अपयश ही सोपं असतं… हसायला गेल तर रडणेही आपल असतं… बघायला गेलं तर आयुष्यही खूप सोपं असतं…  आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ. चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं, यावर आपलं यश अवलंबून असतं.. अश्रु नसते डोळ्या मधे तर डोळे इतके सुंदर असले नसते..! दुःख नसते ह्रदयात तर धडकत्या ह्रदयाला काही किंमत उरली नसती..! जर पुर्ण झाल्या असत्या मनातील सर्व इच्छा तर भगवंताची काहीच गरज उरली नसती..!!  आयुष्य पण हे एक रांगोळीच आहे. ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते. आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..! प्रेम् मधुर...