◾कविता :- संकटच स्वानुभवे... | कवी रा. र. वाघ
संकटच सकलांना
करतात अनुभवी
टवटवी प्रयत्नांना
चतुराई स्वानुभवी
स्वानुभव साधतांना
नुरेनाच शान काही
भर पडे शिकतांना
वेगळेच ज्ञान काही
सबबीने धडपडे
बळे युक्ती आजमावी
लक्ष्य साध्य असे घडे
ताकदीचा जोर लावी
आज यश मिळे जरी
कालचाच ध्यास होता
रत होता खास तरी
तीव्र असा यत्न होता
गुरु बने संकटच
रुळलेल्या वाटेतच
रुक्षपण वाटताच
पीळ पडे दंडातच
तेच मानी आवाहने
मार्ग शोधी सुटकेचा
नादी लागे प्रयासने
वेध घेई संकटाचा
दृढ होते मन असे
ढळेचना धैर्य कदा
ज्ञात होता मनी वसे
नकळत स्थैर्य सदा
सातत्याने परीक्षेचे
कार्य संकटाचे चाली
रसरुप विरतेचे
तीच ठरे खुण भाली
निर्मिती:-
रा.र.वाघ,धुळे.
मो.नं.७५०७४७०२६१)
_____________________________
सदर कविता आवडल्यास नक्की शेअर करा
Comments
Post a Comment
Did you like this blog