जिवन विचार - 37
"मानवप्राणी जसे कर्म करतो तसेच त्याचे फळ मिळते." ह्या कर्मामुळेच प्राणी ह्या संसारातील मायाजाळामध्ये बांधलेला आहे आणि जेव्हा मृत्यू येतो त्यावेळी हे सर्व काही इथेच राहते. ह्या संसारात केवळ कर्मेच प्रमुख आहे.कर्माचेच फळ मणुष्याला मिळते. म्हणून माणसाने दुसऱ्याचे सदैव चांगले सोचले पाहिजे आणि भले केले पाहिजे . 'कर्मामुळे मणुष्य लहान मोठा बनतो.म्हणून चांगले कर्म करा.घृणा, क्रोध, लोभ, मोह यांचा त्याग करा. 👇👇👇👇 चांगल्या कर्माचे साथीदार आहेत. ज्याप्रमाणे "फुलांमध्ये सुगंध"🌹 "तिळामध्ये तेल" "लाकडामध्ये आग" "दुधामध्ये तुप" "ऊसामध्ये रस" ह्या वस्तू बाहेरून पाहून तुम्ही त्यांच्या गुणांचा अंदाज लावू शकत नाही. कारण हे सर्व बाहेरून दिसत नाही.ह्या गुणांना केवळ विचारांनीच ओळखू शकतो. त्याचप्रमाणे मानवी देहामध्ये आत्म्याचा निवास असतो.ह्याची ओळख केवळ विचारांनीच होऊ शकते. 🙏' चांगल्या कर्माच्या स्वरुपाचा विचार करावा.' 'चंदनापरी झिजावे, उपकार लोकी करावे.'