जिवन विचार - 92
जीवन यशस्वी केव्हा होते ? अमेरिकेतील थोर तत्त्वज्ञ इमर्सन म्हणतो, " आपल्या मनोवृत्ती इतस्ततः पसरून ठेवणे म्हणजे जीवनाचा नाश, मनापासून आणि एकाग्रतेने काम केले की जीवन यशस्वी होते ." सूर्याचे किरण भिंगातून केंद्रित करून एखाद्या कागदावर किंवा कापसावर पाडले तर तो एकदम जळून पेट घेतो. मन जर असेच एखाद्या ध्येयात आपण एकाग्र करू शकलो तर आपल्या जीवनातही तेज निर्माण होते.