300 अनमोल सुविचार
१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही. ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला. ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे. ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास. ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस ! १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस ! ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. १३) आपण जे पेरतो तेच उगवतं. १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये. १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो. १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम. १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा. १८) आधी विचार करा; मग कृती करा. १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका, २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! २१) एकमे...