मी पणा का असतो - बोधकथा
कर्तृत्वाची शिखरे गाठल्यानंतर असे अलगद ‘मी’पण गळून पडण्यात एक वेगळा अर्थ आहे. तो समजावून घेता आला, तर अहंकार दागिना म्हणून मिरवण्यात कोणालाही धन्यताच वाटेल. एका राजाची ही गोष्ट. त्याला काही अधिकारी नेमायचे होते, म्हणून त्याने गावात दवंडी दिली. गावातून शंभरेक तरुण मुलाखतीसाठी आले. त्यांची प्रथम त्याने शारीरिक चाचणी घेतली. नंतर मुलाखती घेतल्या आणि त्यातून त्याने चार तरुण निवडले. प्रधानजींना वाटत होते, या मंडळींना राजाने लगेच नोकरीवर घ्यावे; पण राजा मात्र तयार नव्हता. त्याला या तरुणांची परीक्षा घ्यायची होती. राजाने आदेश दिला, ‘या चारही तरुणांना चार स्वतंत्र कोठड्यांत बंदिस्त करून टाका. त्यांना चार दिवस उपाशी ठेवा.’ राजाच्या आदेशाचे पालन करण्यात आले. पाचव्या दिवशी राजाने पुन्हा आदेश दिला, ‘आत चारही कोठडीत जेवणाची ताटे पाठवा आणि पाठोपाठ भीती वाटेल, असे एक कुत्रे प्रत्येक कोठडीत पाठवा.’ राजाची आज्ञा सर्वांनी पाळली आणि सर्वजण त्या तरुणांचे निरीक्षण करू लागले. पहिल्या खोलीत ते जेवणाचे ताट आणि कुत्रे जाताच तो तरुण घाबरला. त्याने जेवणाचे ताट कुत्र्यासमोर ठेवले आणि तो देवाची भक्ती करू...