Posts

Showing posts with the label गाडगे बाबा विस्तृत माहिती

गाडगे बाबा विस्तृत माहिती

नाव  :-  (डेबूजी झिंगराजी जानोरकर ) जन्म :- *२३ फेब्रुवारी १८७६* शेनगांव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र. मृत्यु :- २० डिसेंबर १९५६. वळगांव, अमरावती, महाराष्ट्र.                  १४ जुलै १९४१ ला गाडगे महाराजांची प्रकृति ठीक नव्हती. महानंद सामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेंव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडूनही काहीही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्विकारल्या. पण म्हणाले, "डॉ. तुम्ही कशाला आले?; मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेंव्हा बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणारच नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही