Posts

Showing posts with the label प्रेरणादायक

जीवन विचार - 153

Image
  🔵🔵परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात🔵🔵 ⭕परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते; तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते.⭕ 🔘दुसर्‍याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो, पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो❓म्हणजे मग आपण यात काय साधले❓निंदेमुळे आपलेच मन दूषित होते. दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते.🔘 🌟ज्याला परनिंदा गोड वाटते, त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे.🌟 💮तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे विष उतरल्याची खूण आहे, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. म्हणून, ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.💮 🏵भगवंताच्या मार्गाने जाणार्‍याने, दुसर्‍याच्या ठिकाणी दिसणार्‍या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे, आणि अवगुणाचे तण आपल्या अंतःकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावे.🏵  ♦पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताचा आड येतात हे देखील कळते, पण

लस्सी एक प्रेरणादायी किस्सा...

लेखक  - अनामिक.     शहरातील एका चर्चित दूकानात लस्सी ची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्र-मंडळी आरामात बसून एक दूसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो‌. तेवढ्यात 70-75 च्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली.      तिची कंबर वाकलेली होती, चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भुक तरंगत होती. डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले, "आजी लस्सी पिणार का?"     माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंभित झाले. कारण, जर मी त्यांना पैसे दिले असते तर, फार तर 5 किंवा 10 रुपये दिले असते, पण लस्सी तर 25 रुपयाला एक होती. म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजी कडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खुपच वाढली होती.      आजी ने संकोचून "हो" म्हटले व आपल्या जवळ जे मागून जमा झालेले 6-7 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजले नाही, म्हणून मी त्यांना विचारलं, "हे कशासाठी?"      "यात मिळ