Posts

Showing posts with the label श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी - धर्म

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी - धर्म

समाजामध्ये अनेक रूढी-परंपरा आपण आपल्या परीने जपत असतो. माणसाने नेहमीच श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी. सणाच्या निमित्ताने दान-धर्म, उपवास केले जातात. दानधर्म केला जातो. खरं तर अशा पद्धती जरूर जपाव. महत्त्व देताना मात्र त्या व्यक्तीला खरंच तुमच्या देण्याची गरज आहे का हे पाहावे. आता हेच बघा ना! आपण ज्याच्याकडे खूप काही असते, त्यालाच द्यायला उत्सुक असतो. पण ज्याच्याकडे नाही त्याच्या विचारही डोक्यात घेत नाही. कामाला असणारी मावशीच काय पण आपल्या आसपास असे खूप जण असतात, ज्यांना आपल्या मदतीची खरंच गरज असते, पण होते मात्र उलटेच. आपण ज्या परंपरा जपतो त्यांचा योग्य उपयोग होतो का हेही पाहिलेच पाहिजे. कोणीतरी सांगतो म्हणून करायचे. यापेक्षा तुमच्या मनाला पटणार्‍याच गोष्टी करा. माणसाने श्रद्धा ठेवली तर त्याचा त्रास होत नाही. पण अंधश्रद्धेने मात्र बरीच कामे बिघडतात.   आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनातही बरेच जण त्या परंपरांना व्यवस्थित जपतात. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे त्यांना स्वत:ला त्रास होत नाही ना याचीही त्यांनी स्वत:च काळजी घ्यायला हवी. उपवास केल्याने आजारी व्यक्