Posts

Showing posts with the label मुर्खाशी वाद - बोधकथा

मुर्खाशी वाद - बोधकथा

गवताच्या रंगावरून एकदा गाढव & वाघ यांच्यात वाद झाला. गाढव : "गवताचा रंग निळा" वाघ : "गवताचा रंग हिरवा" वाद खूप वेळ चालला तरी दोघांमधे एकमत होऊच शकले नाही. शेवटी मामला जंगलच्या राजाकडे गेला सिंह दरबारात सुनावणीचे सर्व तयारी झाली. दोन्ही पक्ष आपाले बाजू मांडले. जंगलातले सर्व प्राणी उत्सुकतेने निर्णयाचे वाट पाहू लागले सर्वांच्याच अपेक्षांच्या विपरीत निर्णय आला "वाघाला एक महिन्याची कठिण सजा व गाढव निरपराधी" निर्णयाने नाराज होऊन वाघ राजाला विचारता "गवताचं रंग हिरवंच ना ???" राजा : "होय" वाघ : "मग मला का ही सजा?"  राजा म्हणाला "तू बरोबरच आहेस, पण ह्या एका विषयावर गाढवाशी वाद घालणे हे चुकिचे आहे." "ह्या पुढे तरी अज्ञानी बरोबर वाद घालू नये म्हणून ताकीत देण्यासाठी ही शिक्षा दिली आहे." तात्पर्यः मुर्खाशी वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो.