Posts

Showing posts with the label जिवन विचार - 42

जिवन विचार - 42

जगातील सर्व माणसं सुखासाठी धडपडतात.अनेक संकटांना तोंड देतात.कधी हरतात ,तर कधी जिंकतात. जिंकण आणि हरणं हे शेवटी एका क्षणाचं असतं.हे जेव्हा कळतं तेव्हा माणूस अंतर्मुख होऊन विचार करतो.*     *आपल्या आत्मयाचा आवाज परमात्मयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो देवापुढं काही मागणं मागतो.अस मागण म्हणजे तो प्रार्थना करतो.*👏🙏 *या प्रार्थनारुपी हाकेतून आत्म्याची निश्चित उत्कंठा करतो.प्रार्थना ही पण दोन प्रकारे केली जाते.सकाम आणि निष्काम प्रार्थना.जेव्हा आपण देवापुढ काही मागतो ते सकाम प्रार्थना आणि जेव्हा आपलं काही देवापुढ मागणं नसतं आहे त्यात समाधान मानने असते ही झाली निष्काम प्रार्थना.* *प्रार्थना ही धैर्य आणि आत्मबलाची जननी आहे.आपले जैविक आणि आत्मबल वाढविण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत* *आहे.स्वार्थारहित खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना होय.*  *संत तुकाराम महाराज  म्हणतात , 'न लगे मुक्ती धनसंपदा ' संत तुकाराम महाराजांनी देवापुढं मुक्ती मागितली नाही तर भक्ती मागितली.ईश्वराविषयीचा उत्कट प्रेमातून प्रार्थना जेव्हा जन्म घेते तेव्हा ती खरीखूरी भक्तीमय प्रार्थना असते.*