जिवन विचार - 90
जीवनकलेचा उपासक आपल्या हृदयाशी काही निष्ठा बाळगत असतो.पहिली निष्ठा आहे *सत्यनिष्ठा.*कला ही कशाची नक्कल नसते, ती अस्सल असते. ती प्रतिकृती वा अनुकृती नाही , स्वतंत्र निर्मिती आहे. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेणे त्याला शब्दनिष्ठा म्हणतात, स्वतःच्या अनुभवाने निष्कर्षाप्रत येणे याला *सत्यनिष्ठा* म्हणतात. *सत्यनिष्ठ* माणूस जीवनात सारखे प्रयोग करीत असतो. प्रयोगातून चिंतन , चिंतनातून प्रयोग अशी त्याची साधना चालू असते. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र विभूती आहे, हे लक्षात घेऊन माणसाने दुसऱ्यांचे अनुकरण करु नये तर आपले स्वतःचे स्वत्व ओळखून ते विकसित करण्याचा प्रयत्न करावा. *We must learn to be ourselves*.