जिवन विचार - 88
सामान्यांच्या प्रयत्नांना विशिष्ट वळण देण्यासाठी आणि त्यांच्या अव्यवस्थित शक्तीला सुव्यवस्थित वळण देण्यासाठी *महापुरुष* 🙏 प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील लाखो धडपडणार्या जीवांना संघटित करून त्यांच्या जीवनात सुखाची बरसात करणारी महान शक्ती म्हणजे🙏 छञपती शिवराय होय. दीनदलीतांची सर्वांगीण उन्नती व्हावी म्हणून आयुष्यभर काम करणारे 🙏भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महापुरुष होत. आपल्या समाजातील प्रत्येकाचं मन निर्भय व्हाव, मस्तक उन्नत व्हावं आणि प्रत्येकाच्या शब्दाला सत्याचा परिस स्पर्श घडावा या भारतीय संकल्पनेचे महान कवी 🙏रवींद्रनाथ टागोर म्हणजे एक महापुरुष होय. या आणि अशा कितीतरी महापुरुषांनी आपली भारतीय संस्कृती नटलेली आहे. असे कितीतरी महान महापुरुष होऊन गेले आहेत. महापुरुष म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक *'सुवर्णपान'.*