◼️ प्रेरणा :- पाटोदा गावच्या सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची स्वनिवृती ....
कृपया खालील लेख सर्व वाचा सलग ३० वर्षे एकाच ग्रामपंचायतीचे सरपंच असणारे भास्करराव पेरे पाटील यांनी गावच्या सरपंच पदाची स्व-निवृत्ती घेतली ... धन्य ते गाव पाटोदा धन्य ते सरपंच आपण निवृत्ती का घेत आहात असे पत्रकारांनी विचारल्यावर भास्करराव पेरे पाटील यांनी पत्रकारांना दिलेले उत्तर :- मी माझ्या हाताने सलग तीस वर्षे माझ्या गावाची सेवा केली आहे .. माझ्या गावचे सेवा करण्यापासून मी कंटाळलो नसून, मी फक्त माझ्या गावातील तरुणांना माझ्या व्यतिरिक्त गावची सेवा करण्याची संधी देत आहे. आणि याची मला पूर्ण जाण आहे. माझ्या गावचे तरुण माझ्यापेक्षा जास्त चांगली गावची सेवा करतील. मी ह्यावर्षी सरपंच चा फॉर्म भरला नाही म्हणजे, मी गावची सेवा करणार नाही असे मुळीच नाही. मला आशा आहे.माझ्या गावचे तरुण माझ्यापेक्षा चांगले काम करून दाखवतील. आणि पाच वर्षानंतर तुम्हीच येऊन बघा . 🔷वाचकीय मनोगत🔷 महाराष्ट्रासाठी आदर्श असलेले, पाटोदाचे आदर.मा. सरपंच भास्करराव पेरे पाटील हे शिवउपरोक्त व्यक्तिमत्व आहे. मागील तीस वर्षात त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आपले गाव खरंच शिवकालीन स्वराज्य निर्माण केले आहे. आद...