Posts

Showing posts with the label जोपासना चांगल्या विचारांची - बोधकथा

जोपासना चांगल्या विचारांची - बोधकथा

   एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले.    परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली.     जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त वीस लोक असतांना का दिली?    तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला."...