Posts

Showing posts with the label भक्ती

कविता :- आतुरता

Image
_________________________________________ दिनांक :- 22 ऑक्टोंबर 2020 ला मराठीचेे शिलेदार समूहावर  प्रकाशित झालेल्या बेस्ट पाच कविता _______________________________________ आतुरता  आस लागली दर्शना  दर्शना बा विठ्ठलाची  वारी कार्तिकी समीप  आतुरता पंढरीची  ॥  मुख दर्शनासी तुझ्या तुझ्या मुकलो रे आम्ही  द्वार उघड विठ्ठला  वाळवंटी ये विश्रामी ॥  वर्ष सरत आले रे  दु:ख थमता थमेना  तुझ्या दर्शनाविना हे  चित्त कशात लागेना ॥  तुच कष्ट निवारण्या  धाव भक्तांच्या हाकेला  पंढरीचा राजा तुझा  भक्त दर्शना भुकेला ॥  आतुरता संपवून  टाक एकदाची सारी  करू दे आम्हां भक्तांना  नित्य नियमाची वारी  ॥  दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)  उस्मानाबाद ©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह 🌸💐🌸💐🌸 आतुरता मनी दाटली मला माझ्या विद्यार्थ्यांना भेटायची  सांग सांग देवा आता शाळा कधी उघडायची बे एके बे बे दुणी चार शिकवायचा मला शिष्टाचार  दुःख करायची वजा अन सुखाचा करायचाय गुणाकार...

मी पणाचा पराभाव :- एक किस्सा स्वामी समर्थांचा

Image
                       स्वामी समर्थ  बाबा सबनीस एक प्रकांड विद्वान कीर्तनकार होते. राम मंदिरात त्यांचे कीर्तन होते. सर्व लोकं मंत्र-मुग्ध होऊन कीर्तन ऐकतात.  तिथे हरीबाई नावाची एक बाई येते आणी मंदिराच्या पायरीवर किर्तना कडे पाठ करुन रामाचे नामस्मरण करत बसते.   कीर्तन संपल्यावर हरी बाईला बाबा सबनीस विचारतात-" तुम्हाला काय आम्ह्चे कीर्तन ऐकावे असे नाही वाटत का?"  हरी बाई थोड्या फटकल पणे बोलते-"या मोठ्या-मोठ्या गोष्टी मला समझत नाही.कानातून मनात पोहचत नाही. "  "आम्हाला आमचे स्वामींच्या साध्या-सरळ गोष्टी आवडतात."   तितक्यात नारायण शास्त्री येउन बाबा सबनीसला म्हणतात: " तुम्ही या मुर्ख बाईशी काय वाद घालत आहा?'  " या सर्वाना त्या भोंदू स्वामीनी वेड लावले आहे."  मग शास्त्री बाबा सबनीसला म्हणातात की हनुमान जयंतीला स्वामी राम मंदिरात येणार आहे, तिथे तुम्ही आपल्या विद्वत्तेनी शास्त्रात  त्यांचा पराभव करा. हनुमान जयंतीच्या दिवशी स्वामी मंदिरात येतात.ब...