Posts

Showing posts with the label रायगड

◼️ परीक्षण :- जगभरातील किल्ले व त्याचे अवलोकन

Image
स्वित्झर्लंडमधल्या Zurich  मध्ये जगामधल्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन भरलं होत. जगातले उत्तोमोत्तम किल्ले तिथे मांडण्यात आले होते, इजिप्तचे, ग्रीसचे, रोमचे, रशियाचे, चीनचे, जपानचे आणि जगभरातल्या गडकोटांमध्ये सर्व जगात सर्वोत्तम ठरला तो महाराजांचा राजगड. शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते तेव्हा राजगड बांधायला सुरवात केली आणि शिवराय २६ वर्षाचे झाले तेव्हा राजगड बांधून पूर्ण झाला. जगभरातल्या अभियंत्यांनी शिवाजी महाराज या अभियंत्याला मुजरा केला.  महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावर झाला त्या रायगडाचं बांधकाम महाराजांची राजधानी म्हणूनच करण्यात आलं.  या रायगडावरील सभामंडपामध्ये विशिष्ट प्रकारची ध्वनीसंवर्धन व्यवस्था करण्यात आलेली आहे. राजसभेच्या सभामंडपाच्या सुरुवातीला  नगारखानाच्या खाली कितीही हळू आवाजात बोलले तरी सिंहासनाजवळ आजही स्पष्ट ऐकू येते. ध्वनी क्षेपकाचा शोध लागण्यापूर्वी ध्वनी क्षेपकाशिवाय ऐकू येण्याची ही तंत्रप्रणाली शिवाजी महाराजांनी रायगडावर निर्माण केली. आता आज  आमच्याकडे ग्राम स्वछता अभियाने आली आहेत. पण  रायगडावर अथवा कुठल्याही किल्ल्यावर साडेतीनशे वर्षा