किसान रथ अॅप विषयी माहिती - शेतकरी
शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा यासाठी केंद्र सरकारने किसान रथ अॅप लाँच केला आहे. या अॅपवरून शेतकरी आपला माल विकू शकतात. केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी या मोबाइल अॅपची लाँचिंग केली आहे. करोना व्हायरसमुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी मोठी अडचण येत आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा यासाठी केंद्र सरकारने किसान रथ मोबाइल अॅप लाँच केला आहे. या अॅपवरून शेतकरी आपला माल विकू शकतात. केंद्रीय राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी या मोबाइल अॅपची लाँचिंग केली आहे. या अॅपवरून शेतकरी मालाची खरेदी-विक्री अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. सर्वात आधी अँड्रॉयड स्मार्टफोनवर किसान रथ अॅपला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर स्वतःचे नाव, मोबाइल नंबर, आधार नंबर यासारखी माहिती भरण्यासोबत पीएम किसानसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. जर आपण व्यापारी असाल तर आपल्या कंपनीचे नाव, स्वतःचे नाव, मोबाइल नंबरसह नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मोबाइल नंबर आणि एक पासवर्ड च्या माध्यमातून