Posts

Showing posts with the label पारधी व साळुंकी - बोधकथा

पारधी व साळुंकी - बोधकथा

एका पारध्याने पक्षी पकडण्यासाठी एके ठिकाणी जाळे मांडून ठेवले. त्यात एक साळुंकी सापडली. ती मोठमोठ्याने ओरडू लागली,  'अरे देवा! मी असा काय अपराध केला आहे ? मला अशा संकटात का घातलास? मी काही कोणाचे पैसे, सोन चोरलं नाही? मी फक्त गव्हाचा दाणा घेतला, तेवढयासाठी एवढी मोठी शिक्षा ! तात्पर्यः "चोरलेली वस्तू कितीही लहान व शुल्लक असली तरी त्यामुळे चोरीचा गुन्हयाचे स्वरूप लहान होते असे नाही."