Posts

Showing posts with the label जिवन विचार -28

जिवन विचार - 28

राबिया नावाची एक सूफी संत होती.रात्रीची वेळ होती. ती हातात कंदील घेऊन घराबाहेर काहीतरी शोधत होती.  एकानं विचारलं, ' काय शोधताय ?'  राबिया म्हणाली , ' सुई हरवलीय. '   दुसऱ्यान प्रश्न केला, 'कुठं?' राबिया म्हणाली ,  'घरात '. मग घराबाहेर कशाला शोधताय? घरात शोधा.' एकजण  म्हणाला. एव्हाना सगळं गाव तिथे गोळा झालं. तेव्हा जमलेल्या लोकांच्याकडं पाहून राबिया हसून म्हणाली, 'लोक हो ! अनेक वर्षापासून मी हेच सांगत आलेय की; देवाला बाहेर शोधू नका, त्याला तुमच्या ह्दयातच शोधा.    खरं तर आपणच आपल्या मनातील 'आनंदाची वनराई' जपून ठेवली पाहिजे . या विचारतच आपल्या जीवनाचा खरा शोध लपलेला आहे.