साई बाबांचे महान विचार - धर्म
सत्य साई बाबा सर्वधर्माच्या लोकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांचे विचार खूप प्रभावशाली होते. जाणून घ्या त्यांचे 20 मौल्यवान विचार: * जर तुम्ही प्रभूमध्ये नेहमी पूर्ण विश्वास ठेवाल तर तुमच्यावर त्यांची कृपा अवश्य होईल. ईश्वराची कृपा असल्यास कर्माचे दुःख दूर होतात. प्रभू मनुष्याला कर्माने पूर्ण रूपाने वाचवू शकतात. * कर्तव्य हेच देव आहे कर्मच पूजा आहे. किंचित कर्म देखील प्रभूंच्या चरणात टाकलेले फुलासमान आहे. * सर्वांना प्रेम द्या. सर्वांची सेवा करा. * मदत नेहमी करावी. दुःख कधी देऊ नये. * देणे शिकावे, घेणे नव्हे. सेवा करणे शिका, राज्य करणे नव्हे. * दिवसाची सुरुवात प्रेमाने करावी. प्रेमाने दिवस घालवावा. प्रेमाने दिवस भरून द्यावा. प्रेमाने दिवस संपवावा. हाच ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. * या तीन गोष्टी नेहमी लक्षात असू द्या- जगावर विश्वास ठेवू नका. प्रभूला विसरू नका. मृत्यूला घाबरू नका. * तुम्ही माझ्याकडे एक पाऊल टाका, मी तुमच्याकडे शंभर पाऊल टाकेन. * सर्व कर्म ...