Posts

Showing posts with the label स्वर्ग आणि नरक मधील फरक - बोधकथा

स्वर्ग आणि नरक मधील फरक - बोधकथा

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता. त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला. “ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.” देव म्हणाला. त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं. त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला. एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती. टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं. त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं. पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती. त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते. त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती. कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता त्यांच्या यातनांना अंत नव्हता. भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते. “हा नरक आहे...”देव म्हणाला. “चल आता स्वर्ग पाहू. ”ते दुस-या दारातून आत आले. ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती. तेच टेबल तेच खिरीचं भांडं. भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे. पण ही सगळी माणसे तृप्त समाधानी व आनंदी दिसत होती. आपापसात हसत आनंदाने राहत होती. “मला कळत नाहीये” संत म्हणाला,”सारख्याच खो...