आत्मपरीक्षण - मराठीचे शिलेदार समूहावर 10 ऑक्टोबर 2020 ला प्रकाशित झालेल्या कविता
आत्मपरीक्षण या करायची आली जेव्हा वेळ तेव्हा विचारांचा बसेना मनाशी मेळ गुणांची माझ्या बेरीज होऊ लागली अवगुणांची बाकी शून्य आली वाणीतल्या गोडव्याने जणू माझी साखर वाढली साखरेच्या वाढीने आरोग्याची घडी ढासळली माझ्या हुशारीने जरी वाढवली माझी तरतरी कळले मला हुशारी पेक्षा सरस असते दुनियादारी आत्मपरिक्षण करताना कळली सत्वपरीक्षेची किंमत स्वतःलाच श्रेष्ठ म्हणण्याची गळून पडली हिम्मत उमगले मला मग गुपित माझ्या मनीचे कर्म करीत असताना चूक बरोबर हे आपण नाही ठरवायचे सौ अनिता व्यवहारे ता श्रीरामपूर जि अहमदनगर सदस्य मराठीचे शिलेदार समूह शब्दांना शब्दांत गुंफून देवूया साज मनानेच ठरवले स्वः आत्मपरिक्षण करु आज चांगले आणि वाईट विचारांची करुया छाननी दोन विभाग पाडून करु पध्दतशीर मांडणी दुर्गुणांची वाढली लांबलचक यादी सदगुणांनपेक्षा त्यांनी ">मारली जोरदार बाजी क्रोधीत देहाला हवी आहे मनःशांती सत्संग, सद्विचाराने षडरिपूंनवर होईल क्रांती ह्दयाच्या अंतर्मनात राग,व्देष यांचा पहारा शांती,समजुतदारपणा यांचा लागत नाही थारा सौ.मनिषा दिपक सा