जिवन विचार - 27
तीन गुरू प्रमाणे माझी तीन उपास्थ दैवतही आहेत.माझे पहिले उपास्थ दैवत विद्या. विद्येशिवाय काही होऊ शकत नाही. अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरूरी आहे . खरा प्रेमी ज्या उत्कंठेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो ,तशा उत्कटतेने माझे पुस्तकांवर📚 प्रेम आहे . शत्रूलाही कबुल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे. माझे दुसरे उपास्थ दैवत विनयशीलता हे आहे. विनय म्हणजे लीनता ,लाचारी नव्हे. माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते . चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही. मी माझ्या बुध्दीप्रमाणे चालतो. 🙏 परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही. शीलसंवर्धन हे मी माझे तिसरे उपास्थ दैवत समजतो. - *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*📚📚📝📖🙏🙏💐💐 *'सत्य आणि न्याय याहून कुठलाही धर्म मोठा नाही.*' 📚 📙 📖 📚 📝