जिवन विचार - 59
राबिया नावाची एक सूफी संत होती.रात्रीची वेळ होती. ती हातात कंदील घेऊन घराबाहेर काहीतरी शोधत होती. एकानं विचारलं, ' काय शोधताय ?' राबिया म्हणाली , ' सुई हरवलीय. ' दुसऱ्यान प्रश्न केला, 'कुठं?' राबिया म्हणाली , 'घरात '. मग घराबाहेर कशाला शोधताय? घरात शोधा.' एकजण म्हणाला. एव्हाना सगळं गाव तिथे गोळा झालं. तेव्हा जमलेल्या लोकांच्याकडं पाहून राबिया हसून म्हणाली, 'लोक हो ! अनेक वर्षापासून मी हेच सांगत आलेय की; देवाला बाहेर शोधू नका, त्याला तुमच्या ह्दयातच शोधा. खरं तर आपणच आपल्या मनातील 'आनंदाची वनराई' जपून ठेवली पाहिजे . या विचारतच आपल्या जीवनाचा खरा शोध लपलेला आहे.