◾माहिती :- अर्जुन या नावाचा अर्थ
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कार्याला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे पहीले लक्षण आहे. बुध् म्हणजे जाणणे, समजणे. निखळ *बुद्धी,* रागव्देषांपासून अलीप्त बुद्धी हे ज्ञानाचे खरे साधन होऊ शकते. *बुद्धी* ही विकार , पूर्वग्रह , रुढींचे संस्कार , अहंकार इत्यादी उपाधींपासून मुक्त झाली म्हणजे ती शुद्ध होते , स्थिर होते, डळमळत नाही , तिच्यात कंप राहत नाही. अशा बुद्धीला ऋजु बुद्धी असे नाव आहे. ज्ञानाचा दृष्टीने ऋजुता हा सर्वात मोठा गुण आहे. ऋजुतेशिवाय निश्चित आणि निष्कंप ज्ञान लाभणार नाही. *अर्जून* या शब्दाचा अर्थही मुळात ऋजुबुध्दी' असाच आहे.