◾माहिती :- अर्जुन या नावाचा अर्थ

कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कार्याला आरंभ न करणे आणि सुरू केलेले काम पूर्ण  करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे पहीले लक्षण आहे.

बुध् म्हणजे जाणणे, समजणे.
निखळ *बुद्धी,* रागव्देषांपासून अलीप्त बुद्धी हे ज्ञानाचे खरे साधन होऊ शकते. 
*बुद्धी* ही विकार , पूर्वग्रह , रुढींचे संस्कार , अहंकार इत्यादी उपाधींपासून मुक्त झाली म्हणजे ती शुद्ध होते , स्थिर होते, डळमळत नाही , तिच्यात कंप राहत नाही. अशा बुद्धीला ऋजु बुद्धी असे नाव आहे. ज्ञानाचा दृष्टीने ऋजुता हा सर्वात   मोठा गुण आहे. ऋजुतेशिवाय निश्चित आणि निष्कंप ज्ञान  लाभणार नाही.

 *अर्जून* या शब्दाचा अर्थही मुळात  ऋजुबुध्दी' असाच आहे.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...