भगवान महावीर यांचा जीवन परिचय
⚡ कर्मकांड, अवडंबर आणि भीतीने दबलेल्या भारतीय जनतेला रस्ता दाखविण्यासाठी इ.स.पूर्व 6 व्या शतकात जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जन्म घेतला. या काळाला बौद्धिक उलथापालथ व अर्धवट ज्ञानावर आधारित अध्यात्मिक क्रांतीचा संक्रमण काळ मानला जातो. 💁♂️ *कुळ* : रूढी, परंपरा, परस्परांमधील वैमनस्य व सोळा महाजनपदांच्या संघ प्रमुखांद्वारे निर्मित हिंसकतेने त्रस्त भारतीय सर्वसामान्यांच्या नजरा अशा आध्यात्मिक प्रणेत्याच्या शोधात होत्या, जो त्यांना अहिंसेच्या माध्यमातून आत्मज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाईल. याच दरम्यान क्षत्रिय कुळातील राजा सिद्धार्थ यांच्या घरी राजकुमार वर्धमान यांनी जन्म घेतला, आईचे नाव त्रिशला होते. वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे त्यांचा जन्म झाला. बिहारमधील मुजफ्फरपुर जिल्ह्यात पूर्वीचे वैशाली होते. भगवान वर्धमान यांच्या भावाचे नाव नंदिवर्धन तर बहिणीचे नाव सुदर्शना होते. त्यांचे बालपण राजेशाही थाटात गेले. आठ वर्षांचे असताना त्यांना शिक्षण व शस्त्रविद्येचे ज्ञान घेण्यासाठी शाळेत पाठविण्यात आले. 👀 *महावीर* : जणसामन्यांमध्ये बसलेला अंधविश्वास, भीती आणि खोटेपणाम...