चहा विकून महिन्याला ५ लाख कमावणारा ‘आयटीवाला
☕ चहा विकून महिन्याला ५ लाख कमावणारा ‘आयटीवाला’ ‘चहासाठी काय पण’* असे म्हणणारे अनेक वेडे या जगात सापडतील. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील एका ‘चायवाली’ने तिच्या देशात चहाचे हॉटेल सुरू केले. यातून तिने कोट्यावधी रूपयांचा नफा मिळवल्याचे तुम्ही वाचले असेल. आता हे झाले परदेशीतील चहासाठी वेडे असण्याचे उदाहरण. पण, महाराष्ट्रातील नागपूरमध्येही एक इंजिनिअर जोडपे चहासाठी वेडे आहेत. या जोडप्याने चहा विकण्यासाठी पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरीला रामराम ठोकून एक ‘चहा व्हिला’ उभारला आहे. नितीन बियानी आणि पूजा बियानी असे या जोडप्याचे नाव आहे. या जोडप्याचे एकमेकांवर असलेल्या प्रेमापेक्षाही जास्त प्रेम चहावर आहे. म्हणूनच आयटी कंपनीतील १५ लाख पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. नोकरी सोडून नागपूरात आल्यावर बियानी जोडप्याने ‘चाय व्हिला, रिफ्रेश युवरसेल्फ’ या नावाचे टी-शॉप सुरू केले. या व्हिलामध्ये चहा आणि कॉफीचे १५ प्रकार उपलब्ध आहेत.आमच्या या दुकानात अनेक प्रकारचे स्नॅक्सही मिळता...