माहिती जाणून घेऊ सप्त ऋषींची - धर्म
आज पर्यंत आपण सप्त ऋषींचे नावच ऐकत आलो आहोत. आज आपण त्यांचा बद्दलची माहिती जाणून घेऊ या.. कोण कोण आहे हे सप्तर्षी... 1 ऋषी वशिष्ठ - ऋषी वशिष्ठ अयोध्याचे राजा दशरथाचे कुलगुरू तसेच त्यांचे चारही मुलं श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नचे गुरु होते. ह्यांचा सांगण्यावरूनच दशरथाने आपल्या चारही मुलांना ऋषी विश्वामित्रांच्या बरोबर असुरांचा संहार करण्यासाठी आश्रमात पाठविले. अशी आख्यायिका आहे की कामधेनू गायीच्या प्राप्तीसाठी गुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्रांमध्ये युद्ध झाले होते. 2 ऋषी विश्वामित्र - ऋषी बनण्यापूर्वी विश्वामित्र एक राजा होते. ते ऋषी वशिष्ठांची कामधेनू गायीला स्वतःच्या तावडीत घेण्याचा प्रयत्नात होते आणि तसं त्यांनी प्रयत्न देखील केले. त्यांनी युद्ध केले आणि ते त्या युद्धात पराभव झाले. या पराभावाने ते तप करण्यासाठी प्रवृत्त झाले. तप करण्याचा वेळी त्यांची तपश्चर्या इंद्रलोकाच्या एका अप्सरेने मेनकाने भंग करण्याचा प्रयत्नही केला. विश्वामित्रांनी एका नव्या स्वर्गाची स्थापनाही केली होती. चमत्कारी आणि सर्वात प्रभावी गायत्री मंत्राची रचना देखील ऋषी विश्वामित्रान