जिवन विचार - 65
"जिंकण्याची घेत मी जोखीम नाही कोणताही सामना अंतीम नाही थेट मी साकारते आयुष्य माझे जाणते रंगीत ही तालीम नाही". मला हरण्याची कधीच भीती वाटत नाही. आणि वाटलीही नाही. कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करते ते शून्यातून करतेय, माझे ध्येय निश्चित आहे,प्रमाणिकपणाच्या कसोटीवर टिकणारे आहे. यातुन जी नवनिर्मिती होईल ती समाजासाठी नक्कीच आश्वासक असेल. स्पष्ट व निर्भीड विचार हाच आमचा अलंकार आहे,कारण व्यक्तीपेक्षा संघटन मोठे असते आणि संघटनापेक्षा विचारधारा आणि म्हणूनच या विचारांनी तुम्हा सर्वांच्या साथीने जेथे असू तेथे असू आपण सर्व विचारांचा बांधीलकीने सदैव एक असू... 🙏शेवटी आशीर्वाद आहे आई-वडिलांचा आणि साथ आहे तुमच्या सर्वांची.🙏