Posts

Showing posts with the label मानवता - बोधकथा

मानवता - बोधकथा

इसाप धन्याकडे नोकर होता. गावाला लागून नदी होती. इसापचा मालक म्हणाला ,  " इसाप , मला नदीवर स्नानाला जावयाचे आहे तु गर्दी आहे का ते पाहून ये जर गर्दी असेल तर ओसरल्यावर जाईन."  गावाला पायवाट होती.शेकडो माणसे नदीवर होती.  इसाप निरोप द्यायला येत असतानाच वाटेवर एक मोठा दगड त्याला आढळला. इसापच्या लक्षात  आले नदीवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या दगडाची ठेच लागून तो अडखळायचा. इसाप म्हणाला , " मालक ,  मला त्या नदीवर एकही माणूस दिसत नाही ."  मालक म्हणाला , " मग चल तर आपण नदीवर स्नानाला जाऊ". दोघेही नदीवर आले. मालक इसापला म्हणाला , इथे तर माणसांची गर्दी  दिसत आहे , तु तर म्हणाला होतास नदीवर एकही माणूस नाही. इसापने उत्तर दिले , " मालक ,  मी यांना माणसं म्हणत नाही ."    " का?  दिसतात तर ही माणसासारखी" इसाप म्हणाला ,  " मालक ,  या पायवाटेवर हा एक मोठा दगड पडलेला आहे . येणाऱ्या -  जाणाऱ्या प्रत्येकालाच त्याची ठेच लागते . तरी सुध्दा एकालाही असे वाटत नाही की आपण तो दगड वाटेच्या बाजूला फेकून द्यावा ,  म्हणजे इतरांना तरी ठेच लागणार नाही . "जो दु