मानवता - बोधकथा

इसाप धन्याकडे नोकर होता. गावाला लागून नदी होती. इसापचा मालक म्हणाला ,  " इसाप , मला नदीवर स्नानाला जावयाचे आहे तु गर्दी आहे का ते पाहून ये जर गर्दी असेल तर ओसरल्यावर जाईन."  गावाला पायवाट होती.शेकडो माणसे नदीवर होती.  इसाप निरोप द्यायला येत असतानाच वाटेवर एक मोठा दगड त्याला आढळला.
इसापच्या लक्षात  आले नदीवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या दगडाची ठेच लागून तो अडखळायचा. इसाप म्हणाला , " मालक ,  मला त्या नदीवर एकही माणूस दिसत नाही ."  मालक म्हणाला , " मग चल तर आपण नदीवर स्नानाला जाऊ". दोघेही नदीवर आले.
मालक इसापला म्हणाला , इथे तर माणसांची गर्दी  दिसत आहे , तु तर म्हणाला होतास नदीवर एकही माणूस नाही.

इसापने उत्तर दिले , " मालक ,  मी यांना माणसं म्हणत नाही ."

   " का?
 दिसतात तर ही माणसासारखी"
इसाप म्हणाला ,  " मालक ,  या पायवाटेवर हा एक मोठा दगड पडलेला आहे . येणाऱ्या -  जाणाऱ्या प्रत्येकालाच त्याची ठेच लागते . तरी सुध्दा एकालाही असे वाटत नाही की आपण तो दगड वाटेच्या बाजूला फेकून द्यावा ,  म्हणजे इतरांना तरी ठेच लागणार नाही . "जो दुसऱ्याच्या सुखाचा विचार करीत नाही , त्याला मी माणूस म्हणत नाही."

इसापने माणसाची मोठी समर्पक व्याख्या केली आहे .
" जो दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो , तोच माणूस ."

तात्पर्यः
जेथे दुसऱ्याच्या सुखाची चिंता सुरू होते , तेथे मानवतेची सुरूवात होते.

Comments

Popular posts from this blog

◾संघर्ष कथा :- एका आदिवासी जमातीतील कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडची ही संघर्ष कथा एकदा नक्की वाचा,खरचं प्रेरणा मिळेल ...

देतो तो देव - बोधकथा

हिरव्या हिरव्या श्रावणात ... | मराठी कविता | संजय धनगव्हळ

कविता :- 📝 पत्र शेवटचं लिहितो आहे ...

◼️हास्य कविता :- दारूड्याची नशा ...

◾ललित लेख :- स्ञी

◾विशेष लेख :- विक्रम साराभाई यांचा एक सत्य किस्सा अवश्य वाचा !

◼️ बोधकथा :- अति तेथे माती

◼️ ललित लेख :- शेवटी काय सोबत घेऊन गेला तो भिकारी ...